श्रीलंकेने घातली इसिससह 11 इस्लामी दहशतवादी संघटनांवर बंदी

0

श्रीलंकेने इस्लामिक स्टेट (इसिस ) आणि अल कायदासह 11 इस्लामी दहशतवादी संघटनांवर देशात बंदी घातली आहे. बुधवारी देशाचे अॅटर्नी जनरल डप्पुला डी. लिवेरा यांनी अधिपृत घोषणेत जाहीर केले की, श्रीलंकन सरकारने देशात 11 दहशतवादी संघटनांच्या कार्यावर कठोर बंदी लादण्यात आली आहे. लवकरच श्रीलंकन सरकार या बंदीआदेशाचे राजपत्र प्रसिद्ध करणार असून त्यानंतर या संघटनांवरील बंदीहुपूम अमलात येईल. 2019 मध्ये इसिसशी संबंधित स्थानिक नॅशनल थोहित जमात (एनटीजे) या दहशतवादी संघटनेने इस्टर संडेला मोठा आत्मघाती हल्ला घडवला होता. त्यात 270 नागरिकांचा बळी गेला होता. त्यात 11 हिंदुस्थानी नागरिकही होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here