”१५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणारच”

0

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात अटक आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राजकारणात खळबळ उडाली आहे. या पत्रात शिवसेना नेते, राज्य मंत्री अनिल परब यांचा उल्लेख आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणावरून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर तीव्र शब्दात टीका करत सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा येत्या पंधरा दिवसात राजीनामा होणार असा दावा केला आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, चला मी आज नवीन घोषणा करतो की, १५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणार आहेत. छापा. मग ते झाल्यानंतर पुन्हा म्हणा, की यांना कसे कळले, हे अमित भाईंशी बोलतात का? एनआयएशी बोलतात का? सगळ्या प्रकारच्या माहित्या यांना कशा मिळतात? असो हा कॉमन मॅनचा अंदाज आहे की अजून दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. असेही पाटील म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here