सचिन वाझे 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत

0

मुंबई : तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाझेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत.

अँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना सलग दोन दिवसांच्या कसून चौकशी नंतर 14 मार्च रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एनआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ते तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत होते. आज त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाझेंसाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:12 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here