असंघटित कामगारांसह रस्त्यावर उतरण्याचा भाजप कामगार आघाडीचा इशारा

0

रत्नागिरी : राज्यभर केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे असंघटित कामगार अडचणीत आले आहेत. त्यांच्या बाबतीत लवकर मार्ग काढला नाही, तर रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप कामगार आघाडीचे रत्नागिरी लीलाधर भडकमकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

निवेदनात म्हटले आहे की, ६ एप्रिलपासून सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावरून दुकानात काम करणारे असंघटित कामगार, माथाडी कामगार आणि कष्टकरी कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. करोनाच्या कालखंडात गेल्या वर्षी सर्व कामगार आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. आता नव्याने लॉकडाउन केल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ कामगारांवर येणार आहे. करोना परिस्थितीमध्ये कंपनी करत असलेली कामगार कपात, कंत्राटी कामगारांना पगार न देणे असे प्रकार चालू आहेत. असंघटित कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्व कामगारांना काम करत असलेल्या आस्थापनाच्या ठिकाणी करोनाप्रतिबंधक लस उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. जिल्ह्यातील कामगारांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. लॉकडाउनमध्ये कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी भाजपा कामगार आघाडी (दक्षिण) रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मागणी करण्यात आली. यावेळी भाजप कामगार आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश शेट्ये, तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, शहराध्यक्ष संदीप रसाळ, कार्यकारिणी सदस्य सुहास नागवेकर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here