आठ दिवस दुकाने बंद ठेवूनही रुग्ण संख्या वाढतेय याचा अर्थ लॉकडाऊनचा काही उपयोगच नाही ?

0

रत्नागिरी : मागील आठ दिवसांपासून व्यापारी आपली दुकाने बंद ठेऊन शासनाच्या नवीन नियमावलीचे पालन करतायत. यामूळे कोरोनाचे संक्रमण कमी होईल अशी शासनाची समजूत आहे. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही समजूत चुकीची ठरते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अर्धवट लॉक डाऊनमुळे कोरोना संक्रमण कसे काय थांबेल? हा प्रश्न आता व्यापारी विचारू लागले आहेत. मागील आठ दिवसांपासून दुकाने बंद होती मग कोरोनाचे संक्रमण का वाढतंय ? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. दुकानदार या लॉक डाऊनच्या प्रचंड विरोधात असून सोमवारी आम्ही आमची दुकाने उघडणारच असा निश्चय अनेक व्यापाऱ्यानी व्यक्त केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:36 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here