कोरोना नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई, दोन दिवसात २६ हजारांचा दंड वसूल

0

रत्नागिरी : कोरोना साथरोग नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने २६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुकानांमध्ये मास्क न लावणे आणि सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. मास्क न लावणाऱ्यांकडून ५०० रूपये तर सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांकडून १हजार रूपये दंड घेण्यात आला. गेल्या दोन दिवसांत २६ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. ‘रनप’ मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील, किरण मोहिते, अतिक्रमण हटाव मोहिमेतील पथकाच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात ही दंडात्मक कारवाई केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here