पाण्याच्या टँकरसाठी सडामिऱ्यातील महिलांचा घेराव घालण्याचा इशारा

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील सडामिऱ्या गाव डोंगरावर वसलेले असून तेथे आता पाणीटंचाई भासू लागली आहे. टँकरची मागणी करूनही अद्याप पाणी न मिळाल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. येत्या आठ दिवसांत टँकरने पाणी मिळाले नाही, तर गावतील महिला हंडा मोर्चा काढणार असून गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांना घेराव घातला जाईल, असा इशारा सरपंच सायली सूर्यकांत सावंत यांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सडामिऱ्या गावाच्या तीन बाजूंनी समुद्राचे खारे पाणी आहे. तेथे पुरेसे पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे उन्हाळा आला की पाणीटंचाई सुरू होते. या वर्षीसुद्धा गेल्या महिन्यापासूनच टंचाई सुरू झाल्याने १८ मार्चला टँकर मिळण्यासाठी अर्ज केला. आता त्यालाही महिना होईल. मात्र या मागणीवर गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांच्याकडून उपाययोजना झालेली नाही. स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पाण्याचे राजकारण केले जात आहे. निवेदन देऊनही महिना होत आला तरी अद्याप पाण्याचा टँकर सुरू झालेला नाही. त्याविरोधात गावातील पाणी आनंद नगर, चौसोपीवाडी, गवाणवाडी आणि मधली वाडीतील महिला हंडा मोर्चा काढणार असून अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत, असा इशारा सरपंच सायली सावंत यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here