“पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड”; खा. उदयनराजेंचं धक्कादायक विधान

0

सातारा : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, भाजपने वारंवार सरकारच्या लॉकडाऊनच्या भूमिकेवर विरोध दर्शवला होता. आता यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (१० एप्रिल) साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना खुप सुनावले आहे. पोलिसांचा आदर करतो पण त्यांना हवं ते करण्य़ाचा अधिकार, लोकांना मारण्याचा अधिकार कोणी दिला असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड अशा भाषेत त्यांनी पोलिसांबद्दल वक्तव्य केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:59 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here