माहेर संस्थेत निराधार जोडप्याचा अनोखा विवाह संपन्न

0

रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्था हातखंबा रत्नागिरी येथे आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेर संस्थेत चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मोहन गुरव व सहा महिन्यापूर्वी दाखल झालेल्या सुप्रिया पाडळकर या निराधार जोडप्याचा हा अनोखा विवाह माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका सि.लुसी कुरियन यांच्या आशीर्वादाने व माहेर संस्थेचे प्रकल्पप्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने हा विवाह पार पडला. विवाहबद्ध झालेले दाम्पत्य संस्थेत येण्याच्या आधी समाजात एकटेच व रस्त्यावर तसेच बस स्टॅन्ड वर राहून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोहन गुरव वय 55 वर्ष यांना साखरपा येथून पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईक नसल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते. तसेच सुप्रिया पाडळकर वय 50 वर्ष यांना राजापूरचे नगरसेवक श्री खलफे व राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी राजापूर बस स्टॅंडवर राहत असल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते.या दोघांच्या भावनांचा आदर करीत पुढील आयुष्याचा आधार मिळवून देण्याचे काम माहेर संस्थेने केले. या विवाह सोहळ्याच्या खर्चासाठी समाजातील दानशूर लोकांना आव्हान करण्यात आले होते. त्यामध्ये वधू साठी लागणारे चांदीचे पैंजण श्रीमती पूजा सुर्वे, वधूची साडी श्रीमती मैथिल नरक, मेहंदी, शाली, पंचपाळ, चांदीची जोडवी, नथ श्रीमती प्राजक्ता पवार, वराचा ड्रेस,पंचा,नारळ, पेढे, हळद श्रीमती रिया सावंत देसाई,लग्न सजावटी साठी लागणारी गोंड्याची फुले, हार, गुच्छ सचिन शिंदे, आईस्क्रीम श्री सौरव मलुष्टे, जेवणासाठी श्रीखंड श्री विपुल सुर्वे, जेवणासाठी रोख तीन हजार रुपये श्री संदीप डोंगरे, यांनी देणगी देऊन या विवाहाला हातभार लावला. या विवाहासाठी माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सि.लूसी कुरियन,माहेर संस्था पुणे चे सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, मंगेश पोळ, बाळू साकोरे तसेच माहेर संस्था रत्नागिरी चे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मीरा गायकवाड, शितल हिवराळे, अमित चव्हाण, रामदास पाटील, शिल्पा डांगे, सीता मिश्रा, विजया कांबळे, नंदिनी पाटील, श्रद्धा चव्हाण, अमित येलवे, जोसेफ दास, आशिष मुळे, तसेच देणगीदार प्राजक्ता पवार, सचिन शिंदे ,वैभव मुकादम, समर्थ नगर मधील चंद्रशेखर चव्हाण, माहेर संस्था हातखंबा व खेडशी येथील सर्व प्रवेशित मुले, मुली, महिला, पुरुष व परिसरातील इतर हितचिंतक शुभेच्छुक उपस्थित होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या विवाहाने एकमेकांना आधार मिळाल्याने वधू-वराच्या चेहर्‍यावरील समाधान पाहण्याचा योग माहेर संस्थेमुळे आला व खऱ्या अर्थाने या जोडप्याची नवजीवनाची सुरुवात झाल्याची भावना लूसी कुरियन व सुनील कांबळे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:28 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here