रत्नागिरीचे राजमाता जिजामाता उद्यान दोन दिवस बंद

0

रत्नागिरी : राज्य शासनाने दर शनिवार-रविवारी संपूर्ण लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध थिबा पॅलेसनजीकचे राजमाता जिजामाता उद्यान आज शनिवारी (दि. १० एप्रिल) आणि रविवारी (दि. ११ एप्रिल) पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय एप्रिलअखेरपर्यंत दर शनिवार-रविवारी लॉकडाउन होणार असल्याने या कालावधीतही उद्यान बंद राहणार आहे. पर्यटक, रत्नागिरीकरांनी याची नोंद घ्यावी. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हे उद्यान सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन उद्यान व्यवस्थापकांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here