लॉकडाऊन निषेधार्थ खा. उदयनराजे कटोरा घेऊन बसले रस्त्यावर, आणि…

0

सातारा : राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनविरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोध केला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी विविध विषयावरून उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

उदयनराजे म्हणाले की, राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही. लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सणासुदीचे दिवस आल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. बँकेचे हप्ते भरायचे आहेत, उद्यापासून नो लॉकडाऊन जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला. यावेळी भीक मांगो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी दुकानदार अथवा व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही तर सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय. तुम्ही सगळं बंद करून उपासमारीची वेळ आणली आहे. आज जी परिस्थिती आली आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठीच लॉकडाऊन केलाय अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here