लॉकडाऊन बाबत उद्या निर्णय, दोन दिवसांत रोड मॅप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत

0

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे. यामुळे उद्या टास्कफोर्सची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीतच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. या बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

राज्यामध्ये कोरोनाचा आकडा सव्वापाच लाखांवर गेला आहे. यामुळे तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. एकीकडे हा विषय असताना सामान्यांवरील संकटही आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत रोडमॅप तयार करणार आहेत. ती झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात येईल, नंतर हळूहळू हे निर्बंध शिथील करण्यात येतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज चर्चा झालीय, निर्णय झालेला नाहीय, उद्या यावर चर्चा होईल असे ते म्हणाले. लोक वाचले पाहिजेत, असे चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचं कन्फ्युजन होतं, असा मुद्दा अशोक चव्हाणांनी मांडला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:55 PM 10-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here