वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण

0

🔳 खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल जिल्ह्यात 251 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालय, कॉलेज ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र हे करताना भविष्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता भासण्याची शक्यता आहे. लाखो रुपयांचा पगार मोजूनही डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. रुग्णांसाठी जागेची व्यवस्था केली तर नर्स, बॉर्डबॉय आणणार कुठून हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. सध्या सुरू असणाऱ्या लसीकरणात काही कर्मचारी वर्ग अडकल्याने एकाचवेळी उपचार व लसीकरण या दोन्ही बाजू सांभाळणे प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. या कामात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. सद्य स्थितीत खासगी डॉक्टरांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे त्यांची मदत प्रशासनाला मिळू शकते. या डॉक्टरांसोबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री हे दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:39 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here