कोविड १९ च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नॉर्वे पंतप्रधानांना पोलिसांनी ठोठावला दंड

0

आज जगातील सर्व देशात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. प्रत्येक देश कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनसारखी पाऊलं उचलली जात आहेत. कोरोनामुळे तयार करण्यात आलेले निर्बंध आणि नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या अशाच एका नियमाचे उल्लंघन नॉर्वेच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे पोलिसांनी थेट पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड आकारला. नॉर्वेच्या पोलिसांनी ९ एप्रिलला सांगितलं की, पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीताल सदस्यांना एकत्रित केले होते. याठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड ठोठावला. पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकरणात दंड आकारला जात नाही. परंतु पंतप्रधान निर्बंध लागू करणाऱ्या सरकारचं प्रतिनिधित्व करतात त्यासाठी आम्हाला त्यांना दंड आकारावा लागला. कायदा सर्वांसाठी एकसमान असतो, पण सर्वजण कायद्याच्या नजरेत एकसारखे नसतात. पंतप्रधानांच्या पतीनेही कायदा तोडला पण त्यांच्यावर दंड आकारला नाही. ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी झाली. त्यांनीही नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावरही दंड आकारला नाही. परंतु पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्यावर दंड आकारण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here