महाराष्ट्रात 8 दिवसांचा लाॅकडाऊन? वाचा आजच्या सर्वपक्षीय बैठकीतील सत्ताधारी, विरोधी पक्ष नेत्यांची मते

0

मुंबई : कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलवली. यावेळी राज्यात संपूर्ण लाॅकडाऊनबाबत विचार केला जात असल्याची चर्चा आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आपली मते मांडली आहेत. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.

🔳 यावेळी मांडण्यात आलेली मते :

▪️ लाॅकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय दिसत नाही, रुग्ण वाढत आहेत त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची वेळ. 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू शकता. करोनाची साखळी तोडण्यासाठी आता लाॅकडाून हाच पर्याय आहे, जनतेला थोडी कळ सोसावीच लागेल, लोकांचा जीव महत्वाचा आहे. आठ दिवसाचा लाॅकडाऊन लागू करावा आणि त्यानंतर हळूहळू अनलाॅक करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

▪️ महिन्याला एक लाख रेमडेसिवीर लागतील, तसेच 50 हजार रेमडेसिवीरची गरज असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

▪️ संपूर्ण लाॅकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल, चाचणी केल्यानंतर अहवाल तात्काळ मिळावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

▪️ रुग्णसंख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्यामुळं लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार. या बैठकीत विरोधी पक्षाचेही मत विचारात घेतले जाणार, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

▪️ सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

▪️ दरम्यान, सर्व परिस्थिती पाहता 8 दिवसांचा लाॅकडाऊनबाबत विचार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:59 PM 10-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here