भाट्ये-पावस-पूर्णगड गावखडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

0

मंत्री उदय सामंत यांच्याकडून पावस, गोळप, गावखडी परिसरातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : पावस, गोळप, गावखडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मंत्री श्री उदय सामंत यांच्याजवळ भाट्ये ते गावखडी हा मुख्य रस्ता वाहतुकीस त्रासदायक झाला असल्याची बाब निदर्शनास आणून सदर काम लवकर मंजुर करावे ही मागणी केली होती. श्री उदय सामंत यांनी देखील या कामाबाबत संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन, 3054 हेड खाली प्रस्ताव बनवून शासनस्तरावरून 7 किमी लांबीचे रुपये 5.50 कोटीचे काम मंजूर करून आणले, सदर कामाला सुरुवात करण्यात आली असून लवकरच काम पूर्ण होणार आहे. मागणी केलेल्या रस्त्याचे काम मंत्री उदय सामंत यांनी कमी कालावधीत मंजूर करून कामाची सुरुवात देखील झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:23 PM 11-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here