खोदाई करताना जुनी जलवाहिनी फुटली

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेंतर्गत शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई केली जात आहे. या खोदाईत ठिकठिकाणची अंतर्गत जुनी जलवाहिनी फुटणे चालूच आहे, रविवारी सकाळी मारुती मंदिर येथे हिंदू कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जलवाहिनी फुटली. या फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने शहरातील अरुंद रस्त्यांवरची खोदाई करून घेण्यात आली. यापुर्वी रुंद रस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी अंतर्गत जलवाहिनी टाकायची आहे तेथे खोदाई पूर्ण करून घेण्यात आली आहे. शहराच्या खालच्या भागात रस्ते अरुंद असल्याने हे काम करता येत नव्हते. अखेर लॉकडाऊनच्या दिवशी संधी मिळाली. अनेक जेसीबींच्या मदतीने जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. मारुती मंदिर येथे सकाळी अशीच खोदाई सरू होती. जेसीबीच्या लोखंडी फाळाच्या दणक्याने तेथील जुनी जलवाहिनी फुटली. सकाळीच या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here