जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये मानधनावर पदभरती

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली डॉक्टरांची आणि इतर पदांची कमतरता लक्षात घेऊन मानधनावर पदभरती जाहीर करण्यात आली आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये वर्ग-१, वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. वर्ग- १ साठी एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्याला दरमहा ६० हजार रुपये मानधन दिले जाईल. बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारकांना २८ हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. वर्ग-३ संवर्गातील जीएनएम परिचारिकांना दरमहा २० हजार रुपये, तर एएनएम परिचारिकांना १७ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. स्वच्छता सेवेसाठी वर्ग- ४ या संवर्गातील वॉर्ड बॉयकरिता दररोज ४०० रुपये मानधन दिले जाईल. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा रुग्णालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:10 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here