ना. उदय सामंत आज सोलापुरमध्ये

0

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आघाडी तर्फे निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उदय सामंत या मतदार संघात आज आणि १५ /१६ तारखेला शिवसेने मार्फत उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी पहिली बैठक उमेदवार भारत भालके यांच्या घरी पंढरपूरला ११.३० वाजता होणार असून दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० ला मंगळवेढा येथे बैठका होणार आहेत. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याच मतदार संघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:50 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here