बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेणाऱ्या खासगी बसचालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे माहीत असूनही बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ९.३० वा. सुमारास मारुती मंदिर येथे करण्यात आली. मनेष यशवंत कोकणी (मूळ रा. चिरवे. पो. मोठे कडवण जिल्हा नंदूरबार सध्या रा. फगरवठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी मारुती मंदिर येथे करमरकर हॉस्पिटल समोर टाटा बस (एमएच-०८-एपी-००७७) मधून चालक मनेष कोकणी हा एमआयडीसी येथील दि यश फाऊंडेशन नर्सिंग अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटरचे ८० विद्यार्थी घेऊन जाताना आढळला. या प्रवासी गाडीची आसन क्षमता ६० इतकी असून २० विद्यार्थी उभे राहून प्रवास करत होते. ही बाब बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस शिपाई नीलेश धांगडे यांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाई केली. त्या नुसार चालकाविरुद्ध भा.दं.वि.कलम २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हेड काँ. लक्ष्मण कोकरे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here