मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक, लॉकडाऊन पॅकेजवर निर्णय होणार?

0

मुंबई : कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होत आहे. या बैठकीत लॉकडाऊनच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आज त्याबाबत काही ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here