या आठवड्यात सीबीआय अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता

0

मुंबई : सीबीआय याच आठवड्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावू शकते. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. सीबीआय अधिकारी काल (11 एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना DRDO मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here