रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाविषयक लॉकडाऊनबाबत सुधारित आदेश जारी

0


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कोरोनाप्रतिबंधक लॉकडाऊनबाबत सुधारित आदेश अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जारी केले आहेत. काही व्यवसायांना त्यात शिथिलता देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, गॅरेज, चार्टर्ड अकाऊटंट, पासपोर्ट कार्यालय, रस्त्याजवळचे धाबे, वृत्तपत्रे, चष्म्याची दुकाने नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात गेल्या सोमवारपासून (दि. ५ एप्रिल) लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार, रविवार कडक संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासाने आणखी काही शिथिलता दिली आहे. याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, तृणधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा समावेश असल्यामुळे वाहनांची दुरुस्तीही आवश्यक आहे. म्हणून गॅरेज सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. बँक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित असलेली कार्यालये सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्याअनुषंगाने चार्टर्ड अकाउंटंट कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवाकेंद्र, सेतू, सिटिझन सर्व्हिस सेंटर, सेतू केंद्र तसेच पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत. या आस्थापना एक खिडकीचा वापर करून सुरू ठेवण्याची मुभा राहील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास दिलेल्या परवानगीनुसार रस्त्याच्या कडेवरील धाबे सुरू ठेवता येतील; मात्र कोणत्याही ग्राहकास धाब्यावर बसून सेवा न पुरविता केवळ पार्सल सेवा घेऊन जाण्यास किंवा खाद्यपदार्थ घरपोच पोहोचविण्यास परवानगी आहे. डोळ्यांच्या रुग्णांसाठी चष्मा ही अत्यावश्क बाब असल्याने अशा रुग्णांसाठी चष्म्याची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या आदेशान्वये घालण्यात आलेल्या वेळेचे बंधन आणि इतर अटी लागू राहतील. मुभा देण्यात आलेल्या आस्थापनांना त्यांच्या कार्यरत कर्मचार्यांनना लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे किंवा १५ दिवसांपर्यंत वैध असणारे चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्याा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. हा आदेश येत्या ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here