रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी

0

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी सध्या दिल्या जात आहेत. यात आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे. डॉ. रेड्डीजने स्पुटनिक V लस भारतामध्ये आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:11 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here