व्यापाऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यापाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणार : बशीर मुर्तुझा

0

रत्नागिरी : कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील वर्षापासून व्यापारी मोठ्या संकटात अडकला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र ठप्प झालं असून भविष्यात देखील व्यापाऱ्याच्या ताटात संकटे वाढून ठेवलेली आहेत. प्रत्येक व्यापारी हा वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणालीशी संलग्न असला तरी व्यापारी महासंघाला नेहमी राजकीय रंगापासून दूर ठेवण्यात आले आहे. मात्र व्यापाऱ्यांची अनेक कामे तडीस नेताना लोकप्रतिनिधींची देखील तितकीच आवश्यकता असते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यापारी महासंघाचे शिष्ठमंडळ मागील काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या सदिच्छा भेट घेत आपल्या अडचणी मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा यांची भेट घेण्यात आली. व्यापाऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यापाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणार असे वाचन बशीर मुर्तुझा यांनी या भेटीच्या वेळी दिले. याप्रसंगी रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखील देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, माजी अध्यक्ष उदय पेठे, उपाध्यक्ष राजकुमार जैन, हेमंत वणजु, अमोल डोंगरे आदि उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:32 PM 12/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here