कळंबणीत उभ्या टेम्पोला बसची धडक, पाचजण जखमी

0

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड कळंबणी बुद्रुक गावाजवळ उभ्या टेम्पोला एस.टी. बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकूण पाचजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बस चालक रमेश देवरे (५८, रा. मुंबई सेंट्रल मूळ रा. उरण रायगड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि.१० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी टेम्पो चालक समीर नवसो गोपाळ (४०, रा. सासोली दोडामारग जि. सिंधुदुर्ग यांनी खेड पोलिसात फिर्यादी दिली आहे. या अपघातात अबदुल गणीम तसुलकर (३८), निकीत चंद्रकात जाधव (२८) अविनाश दत्ताराम खेडेकर (३८), सौ. स्वप्नाली अविनाश खेडेकर (३२) तसेच एस. टी. वाहक घोडे हे जखमी झाले आहेत. याबाबत अधिक पोलीस तपास सुरु आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here