काका-काकीवर सुरीने वार; तरुणावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथे दारूच्या नशेत चुलता तसेच चुलतीवर सुरीने वार करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी सकाळी ५ वा. सुमारास घडली. ईशान दीपक नागवेकर (रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात त्याचे काका प्रशांत नागवेकर (४०, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत नागवेकर यांनी त्यांचा पुतण्या ईशान हा दारू पिऊन त्रास देत असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे केली होती. या रागातून रविवारी सकाळी ईशानने घरात घुसून काका आणि काकीवर सुरीने वार करीत ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here