मी स्वतःदेखील एक व्यवसायिक त्यामुळे व्यापारी महासंघाला माझा नेहमीच पाठिंबा : सुदेश मयेकर

0

रत्नागिरी : व्यवसायिकांचा व्यापार हा धर्म आहे. व्यवसायिकाला कोणती जात, पात, धर्म, पक्ष यापैकी काहीही नसतो. व्यवसायिकांच्या उन्नतीसाठी व्यापारी महासंघा सारखे एक मजबूत संघटन आवश्यक आहे. मी स्वतः देखील एक व्यवसायिक असल्याने माझा व्यापारी महासंघाला पाठिंबा असून महासंघाच्या अडीअडचणी च्या वेळी माझे नक्की योगदान असेल असे आश्वासन राष्ट्रवादीचे तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असणारे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी दिले आहे. आज व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने नगरसेवक सुदेश मयेकर यांची सदिच्छा भेट घेतली व आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, अमेय वीरकर, हेमंत वणजु, किशोर मोरे, गणेश धुरी आदी उपस्थित होते. सुदेश मयेकर यांनी व्यापाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आज मागील वर्षभरापासून कोरोनाचे संक्रमण आहे, कधी जाईल ते आपल्याला माहीत नाही. यादृष्टीने व्यापाऱ्यानी भविष्यातील आव्हानांचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. व्यापाऱ्यांच्या संघटनेत राजकीय कार्यकर्त्यांनी उगाचच ढवळाढवळ करू नये असेही ते म्हणाले. व्यापाऱ्यांचे संघटन हे एकच असावे व ते रत्नागिरी व्यापारी महासंघा प्रमाणे मजबूत असावे अशी भूमिका त्यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:16 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here