मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा

0

रत्नागिरी : तालुक्यातील नामवंत संस्था मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडेच्या 12 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी रहीम हसन माद्रे तर उपाध्यक्षपदी तौफिक इरशाद चिकटे यांची निवड करण्यात आली. तरुण वर्गाचा समावेश करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे ही संस्था रत्नागिरी तालुक्यातील नावाजलेली संस्था म्हणून गणली जाते. या संस्थेच्या दि.माॅडेल इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमवत आहेत. शिक्षण आणि व्यवस्थापन दोन्ही बाबतीत अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या कार्यकारणीच्या निवडीबद्दल परिसरात उत्सुकता लागून राहिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा समावेश प्रथमच या कार्यकारणीमध्ये केला आहे. 12 एप्रिल 2021 रोजी दि मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या हँडओव्हर बैठकीत मुस्लिम एजुकेशन सोसायटी सैतवडे नवीन समितीने जुन्या समितीकडून पदभार स्वीकारला. नवीन कार्यकारिणीकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा व विश्वास व्यक्त होत आहे.

▪️ खालीलप्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे
श्री रहीम हसन माद्रे – अध्यक्ष, श्री तौफिक इरशाद चिकटे – उपाध्यक्ष, श्री गनी इस्माईल खतीब – उपाध्यक्ष, श्री मुजम्मिल दळवी – उपाध्यक्ष, श्री रुमान मकबुल पारेख – जनरल सेक्रेटरी, श्री इलियास अहमद मद्रे – जौइन्ट सेक्रेटरी, श्री वहाब खलफे – खजिनदार, श्री.अकरम कापडे – सदस्य, श्री शफी चिकटे – सदस्य, श्री शदाब लांबे – सदस्य, श्री अजीज वागळे – सदस्य, श्री नकाश पिलपिले – सदस्य, श्री. करामत खलफे – सदस्य, श्री गफ्फार बोंद्रे – सदस्य, श्री युसुफमिया खलफे – सदस्य, श्री निसार खतिब – सदस्य, श्री सज्जाद सय्यद – सदस्य, श्री सलीम चिकटे – सदस्य आणि रफिक मुल्ला – सदस्य

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here