ऑनलाईन आईसक्रीम मागवणे पडले महागात, प्रौढाला सुमारे ६३ हजारांचा गंडा

0

रत्नागिरी : अज्ञात क्रमांकावरून फोन करून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून प्रौढाची सुमारे ६३ हजार २०५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३७ वा. सुमारास घडली. या बाबत सहास शंकर विदवांस(५५. रा. दत्तात्रय अपार्टमेंट, फाटक हायस्कूल, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री त्यांनी डॉमिनोज दुकानातून ऑनलाईन आईसक्रीमची ऑर्डर दिली होती. थोड्या वेळाने त्यांना अज्ञाताने फोन करून फोन टू एसएमएस अॅप डाऊनलोड करण्यास सांगून ओटीपी नंबर मागून घेतला. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून ६३ हजार २०५ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणक झाल्याचे लक्षात येताच सुहास विद्वांस यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here