संगमेश्वर तालुक्यासाठी भाजपकडून रुग्णवाहिका

0

देवरूख : भारतीय जनता पार्टीतर्फे संगमेश्वर तालुक्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांना रत्नागिरी येथे नेण्यासाठी माफक दरात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, भाजपचे ज्येष्ठ नेते तुषार खेतल यांच्या सहकार्याने व संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा उपलब्ध केली आहे. जागतिक महामारी कोव्हिड१९ च्या भीषण परिस्थितीत मानव सेवार्थ संगमेश्वर तालुक्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांना देवरूख ते रत्नागिरी ने-आण करण्यासाठी माफक दरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी भगवतसिंह चुंडावत, हरिभाई पटेल, श्रीधर कबनूरकर, अमित केतकर यांच्याशी संपर्क साधावा. या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:46 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here