दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह ८ रूग्णांचा मृत्यू

0

नवी दिल्ली: देशात सध्या कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी रूग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, ‘रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला,’ अशी माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 01-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here