हैदराबाद : सरकारनं स्पुतनिक व्ही या रशियन लसीला परवानगी दिल्यानंतर शनिवारी दुपारी भारतात या लशींची पहिले खेप पोहोचली आहे. शनिवारी दुपारी हैदराबादेत स्पुतनिक व्ही लसींचे डोस घेऊन आलेलं विमान दाखल झालं. त्यामुळं भारतातल्या लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे. केंद्र सरकारने 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र लसींच्या तुटवड्यामुळं संपूर्ण देशभरात अपेक्षित वेगानं ही लसीकरण मोहीम सुरू झाली नाही. अनेक राज्यांमध्ये तर 45 वर्षांपुढील वयोगटाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीही लसीचे डोस उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा परिस्थितीत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस येण्याची सर्वजण वाट पाहत होते. शनिवारी दुपारी या डोसची पहिली खेप हैदराबादेत दाखल झाली आहे. रशियाच्या मॉस्कोमधल्या गामालेय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुतनिक V ही लस विकसित केली आहे. रशियात ऑगस्ट 2020 मध्ये गॅम-कोविड-व्हॅक या नावाने तिची नोंदणी झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 01-May-21