राजापूर : रायपाटण ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरु करताना नियमित रुग्णालयसेवा व लसीकरण केंद्र बंद करू नये, अशी मागणी भाजपचे नेते आणि कोकण दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण यांनी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता ग्रामीण जिल्हा वार्षिक योजनेतील कोव्हिड-१९च्या ३० टक्के निधीमधुन ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे कोव्हिड हॉस्पिटल किंवा डी. सी. एच.सी. तत्काळ सुरु करणे व ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा अशी मागणी आ. राजन साळवी यांनी खा. विनायक राऊत व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोव्हिडसंदर्भात झालेल्या बैठकीत केली ती स्वागतार्थ असल्याचे गांगण यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 01-May-21