रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 324 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 199 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 125 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 324 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 23 हजार 626 झाली आहे. जिल्ह्यातील आज सापडलेल्या 324 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 186, दापोली 21, खेड 4, गुहागर 15, चिपळूण 19, संगमेश्वर 43, राजापूर 16 आणि लांजा तालुक्यात 20 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.29% आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:52 PM 03-May-21