जिल्हाधिकारी यांच्या बदलीची होती “हवा”

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा बनावट आदेश तयार करून तो व्हाट्सएप द्वारे प्रसारित करून शासनाची, सबंधित अधिकारी व जनतेची दिशाभूल करून संभ्रमावस्था निर्माण केली म्हणून जिल्हाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आता यासंदर्भातील अनेक खुलासे ऐकायला मिळत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक संशयित हा कोल्हापूर, गांधीनगर येथील एका बड्या कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. या संशयिताने अनेकांना मी रत्नागिरीत जिल्हाधिकारी म्हणून येणार असे सांगून हवा तयार केली होती. अनेक सरकारी अधिकारी देखील काही महिन्यांपूर्वी या इसमाचे नाव घेत होते अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पकडण्यात आलेल्या संशयिताचे सासरे पोलीस दलात आहेत असे देखील या संशयित इसमाच्या मित्रपरिवारातून काहीना सांगण्यात आल्याची चर्चा लोकातून ऐकायला मिळत आहे. कोरोना सारखे महाभयंकर संकट असताना व त्याला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा समर्थपणे तोंड देत असताना त्यांच्या लौकिकास बाधा पोहचेल असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:57 AM 04/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here