जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश बनवणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

तपासात बाहेर पडणार काही धक्कादायक गोष्टी

रत्नागिरी : रविवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी खुलासा करत हा आदेश खोटा असल्याचे सांगितले होते. रत्नागिरी खबरदार मध्ये बदलीचे हे वृत्त न आल्याने अनेकांनी हा आदेश खोटा असल्याचे ठामपणे देखील सांगितले होते. याच क्षणापासून रत्नागिरी पोलीस दल या घटनेची पाळेमुळे खोदून काढण्यास कामाला लागले होते आणि आज या प्रकरणातील एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. खोटा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आपल्या खबरींकडून मिळालेल्या माहितीची सांगड घालत एकाच्या मुसक्या आवळाल्या. पण या संशयिताला ताब्यात घेताच काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस या मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत आहेत. लवकरच या घटनेतून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच रत्नागिरी खबरदार वर…

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:16 PM 03/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here