मांडकीत घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लांबवला

0

चिपळूण : तालुक्यातील मांडकी-घाणेकरवाडी येथे बंद घर फोडून रोख रक्कम ५० हजार लांबवली असल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत राजाराम सुर्वे (वय ७१, मांडकी-घाणेकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत सुर्वे यांचं घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील पडवीच्या दरवाजाचे कुलूप लोखंडी शिगेने तोडले. तसेच किचनचे लोखंडी ग्रील उचकटून वाकवून त्याद्वारे चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूमच्या दरवाजाचे कुलूप कापून त्याने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजारांची रोख रक्कम लांबवली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गमरे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 06-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here