‘माझा डॉक्टर्स’ बनून मैदानात उतरा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी डॉक्टर्सना आवाहन

0

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती बिकट झालेली असतानाच आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तयारी करत आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here