ब्रेकिंग : राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या नवी नियमावली

0

मुंबई : राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती त्याला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारनं सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले होते. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ स्थिरावली असली तरी कडक निर्बंध हटवून राज्य सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात काय म्हटलंय?

◾ राज्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआर कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक आहे. हा रिपोर्ट त्याने प्रवास करण्याच्या ४८ तासापूर्वीचा असायला हवा.

◾ ज्या राज्यांना अतिसंवेदनशील घोषित केले आहेत तेथील प्रवाशांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे नियम लागू असतील.

◾ माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये चालक, क्लिनर या दोघांशिवाय इतरांना प्रवास करण्यावर बंदी आहे. जर माल वाहतूक इतर राज्यातून महाराष्ट्रात होत असेल तर त्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देणं बंधनकारक.

◾ जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना कोविडची परिस्थिती पाहता त्या त्या भागात योग्य तो निर्णय घेणे आणि बंधन लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

◾ दूधसंकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध या काळात शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे दूध विकण्यावर अत्यावश्यक सेवेत असल्याने दिलेल्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. घरपोच सेवा सुरू राहील.

◾ एअरपोर्ट, मालवाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनात जे कोणी कर्मचारी असतील त्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यावर सूट

◾ स्थानिक जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारे निर्बंध लादत असताना त्याची माहिती ४८ तासापूर्वी देणं बंधनकारक आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here