ब्रेकिंग : रत्नागिरी जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ दाखल

0

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचेही स्थलांतर केले आहे. तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जैतापुरात वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. वादळाला वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहेत. या वादळचा पुढे सारकण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:16 PM 16-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here