टीम इंडियाला लंडन सरकारकडून मोठा दिलासा!

0

भारतीय संघ पुढील महिन्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहे. त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंची घरोघरी जाऊन RT-PCR टेस्ट करायला सुरूवात केली असून १९ मे ला सर्व खेळाडूंना मुंबईत हजर राहण्यास सांगितले आहे. या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही घेऊन जाता येणार आहे. दरम्यान या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाला लंडन सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लंडन सरकारनं विराट कोहली अँड टीमच्या क्वारंटाईन नियमांत व प्रवासबंदीचे काही नियम शिथिल केले आहेत. तीन महिन्यांचा हा दौरा असणार आहे. लंडन सरकारनं कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारताला रेड यादीत टाकले आहे. नियमानुसार भारतातून येणाऱ्या लंडन किंवा आयर्लंड नागरिकांनाच लंडनमध्ये प्रवेश देण्यात येईल. २ जूनला टीम इंडिया लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ३ जूनला भारतीय खेळाडू लंडनमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर साऊदॅम्प्टन हॉटेलमध्ये त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल. १८ जूनला भारत-न्यूझीलंड यांच्यात फायनल होईल. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत २४ मेपासून क्वारंटाईनमध्ये राहतील. बीसीसीआयनं खेळाडूंसाठी हैदराबाद, दिल्ली व चेन्नई येथून चार्टर्ड फ्लाईटची सोय केली आहे. बंगळुरूत असलेल्या खेळाडूंना गाडीनं चेन्नईत येण्यास सांगितले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here