तौक्ते चक्रीवादळ : रत्नागिरीत पंचनाम्याचं काम सुरु

0

रत्नागिरी : तौक्ते गुजरातमध्ये धडकलं असलं तर त्याच्या मार्गात असलेल्या महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांचं मोठं झालं. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळानंतर पंचनाम्याचं काम सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या नुकसानीच्या (सोमवारी दुपारी 12 पर्यंत) माहितीनुसार, मंडणगड तालुक्यात 200 घरांचं, दापोलीत 350 घरं, खेडमध्ये 30 घरांचं, गुहागर 05 घरं, चिपळूण 65 घरं, संगमेश्वर 102 घरं, रत्नागिरी 200 घरं, राजापूर 32 असे जिल्ह्यातील एकूण 1028 घरांचं नुकसान झालं. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर इथे 1, संगमेश्वर इथे 1, रत्नागिरीमध्ये 3 आणि राजापूरमध्ये 3 असे एकूण 8 जण जखमी झाले आहेत. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरमध्ये 1 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या अशी 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकानं आणि टपऱ्यांचे, 9 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचं नुकसान झालं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here