“आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”

0

मुंबई : गतवर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर अलीकडेच तौक्ते चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील अनेक घरांचे, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करून मदतीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर आणि त्यांच्या घोषणेवर टीका केली आहे. एकामागून एक ट्विट्स करत त्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे.

शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिले
ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिले, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 24-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here