कोरोनासंबंधी साहित्य खरेदी: अधिकार सीईओंना; हसन मुश्रीफ यांची मागणी

0

मुंबई : जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध असल्यामुळे कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस ५० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस ५० लाख रुपयांवरील खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार आहेत. पण कोरोनामुळे बैठकांवर निर्बंध आहेत. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधीत शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here