“शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरणं कोणत्या नैतिकतेत बसतं ?”

0

मुंबई : राज्यात प्रचंड गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही संपण्याचे नाव घेत नाही. कारण, चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते आम्हाला शहाणपणा शिकवतात?’, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर उपस्थित केला आहे.चंद्रकांत पाटील अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, ‘सगळे झोपेत असताना राज्यातील सरकार पडेल’ असे आम्ही म्हटल्यानंतर अजित पवारांनी काहीही बोलण्याची गरज नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून काहीही बोललो नव्हतो. परंतु, अजित पवारांनी त्यावर आमची चेष्टा केली. आता ते बोलले तर मलाही बोलावेच लागणार. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. एखाद्या गोष्टीला १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते आम्हाला शहाणपणा शिकवतात?’, असा अत्यंत बोचरा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 07-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here