सातारा जिल्ह्यात नवे 875 कोरोना पॉझिटिव्ह

0

सातारा : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये काहीशी घट दिसून आली असून 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 376 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 14 हजार 780 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 76 हजार 663 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 57 हजार 944 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 887 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:13 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here