“जर पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर…”, तुषार भोसलेंचा अजित पवारांना इशारा

0

नाशिक : यावर्षी देखील आषाढी वारी वारकऱ्यांशिवाय होणार आहे. कोरोनाचा प्रसार लक्षात घेता वारीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे. आज (१२ जून) नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले.

मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे. काही वारकरी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. कुंभमेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाल्यामुळे वारीला एवढी गर्दी होणार नाही. पालखी सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वारकरी संप्रदाय तयार होता. मात्र, सरकारने परस्पर निर्णय घेतला. या निर्णयाला कोणत्याही वारकऱ्याने पाठिंबा दिला नसल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:27 PM 12-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here