सरपंचांच्या बेजबाबदारपणामुळे नावडी येथे कोरोना रुग्ण संख्येत वाढ; माजी उपसरपंच कदम यांचा आरोप

0

माभळे : संगमेश्वर नावडीच्या सरपंचांच्या बेजबाबदारपणामुळेच रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप माजी उपसरपंच संजय कदम यांनी केला आहे. तशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी, पोलिस ठाणे, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. नावडी संगमेश्वरच्या ग्रामपंचायत क्षेत्रात सापडलेल्या रुग्णांबाबत कोणत्याही स्वरुपाची माहिती ग्रामकृती दलाला दिली नाही. तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. तसेच रुग्णांना फिरण्यापासून मज्जाव केला गेला नाही, असे या तक्रारीत म्हटले आहे. गावामध्ये म्हणूनच रुग्ण वाढले. या सर्व प्रकाराला नावडीचे प्रभारी सरपंच विवेक शेरे हे जबाबदार आहेत. म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी, पोलिस ठाणे, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना माजी उपसरपंच संजय कदम, वैभव मूरकर आणि मंदार खातू यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 18-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here