घरगुती भांडणांमधून सुनेचा सासूला धक्का; टेबलावर आदळल्याने सासूचा मृत्यू; घटना बघण्यासाठी येणाऱ्या शेजारणीचाही मृत्यू

0

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा पाथरवाडी येथे घरगुती भांडणांमधून सुनेने सासूला धक्का दिल्याने सासू बाजूच्या टेबलावर आदळल्याने तिच्या डोक्याला जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला. या मृत्युमुखी पडणाऱ्या महिलेचे नाव श्रीमती वनिता रामजी जड्याळ असे आहे. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सौ मानसी महेंद्र जड्याळ हिचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारच्या घरात झालेला हा प्रकार पाहण्यासाठी घाईघाईने येणाऱ्या मयत हिची जाऊ सौ अनिता अनंत जड्याळ या महिलेचा शेजारच्या घरातील अंगणात पाय घसरून ती तोंडावर उपडी पडल्याने जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. ताम्हणमळा पाथरवाडी राहणाऱ्या श्रीमती वनिता जडयाळ यांची सौ मानसी महेंद्र जड्याळ ही सून आहे. पाण्याने भरलेल्या हंड्यात माती टाकल्याच्या कारणावरून त्यांचे मध्ये जोरदार भांडण झाले तेव्हा सुनेने रागाने सासूच्या डोक्यात काठी मारली. ही काठी हिसकावून घेण्यासाठी दोघींच्यामध्ये झालेल्या ओढा-ओढीत मानसी हिने सासूला धक्का दिला. त्यामुळे वनिता या ओटीवर ठेवलेल्या लाकडी टेबलाच्या कोपऱ्यावर जोरात आदळल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जड्याळ यांच्या घरी झालेल्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या तिची जाऊ सौअनिता जड्याळ या घाईघाईने शेजारच्या अंगणात येत होत्या त्यावेळी त्यांचा पाय घसरला. त्यामुळे अनिता या तोंडावर आपटल्या त्यामुळे त्यांच्या छातीला पोटाला मार लागून त्यांचाही मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:57 PM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here